जीवन (Life)
जीवन (Life)...
कधी कधी भावनांना ठेच पोहोचताच
मन एखाद्या उध्वस्त धर्मशाळेसारखे होते..
बाहेरून चार भिंती दिसत असल्यातरी..
चार भिंतींच्या आत कोणीच कोणाचे नसते..
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादे असे वळण येते आणि वाटते आता सगळे संपते. पण प्रत्येक शेवट हा एका नव्याची सुरुवात असतो. आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो यावर ते अवलंबून असते.
कधी काही प्रसंग माणसाला बरेच काही शिकवून जातात. काही लगेचच तर काही बऱ्याच उशिरा. पण कश्याचाही बाऊ न करता जर डोळसपणे विचार करता आला तर ती संधी ठरते आणि त्या संधीचे सोने ही करता येते.
जशी प्रत्येक गोष्ट पैश्यात मोजता येत नाही तसेच समाधानात ही मोजता येत नाही. पण आजच्या काळात एकमेकांची जोड मात्र हवीच .
Comments
Post a Comment